चामोर्शी : केवळरामजी हरडे कॉमर्स कॉलेज चा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दि 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाला या महोत्सवाचे उद्घाटन नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ नामदेव कोकोडे यांच्या हस्ते तर समारोप व बक्षीस वितरण गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलसचिव डॉ अनिल हिरेखन व मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ ए चंद्रमौली यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर यांच्या हस्ते कुलसचिव डॉ अनिल हिरेखन व अधिष्ठाता डॉ ए चंद्रमौली याचे शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी मोठ्या संख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी ,माजी विद्यार्थी ,पालक ,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
या प्रसंगी आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी खेळाडू तसेच कलाकारांना सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयात दिले जाणारे वार्षिक पुरस्कार ,उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून अरबाज शेख,अर्चना सातार व प्रिया बागची यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच क्रीडा संघटक पुरस्काराने सचिन रोहनकर, प्रकाश धानफोले, सौरव गुरनुले यांना सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे महाविद्यालयाचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजे ,कै. रमेश भालचंद्र नाईक पुरस्कृत “स्वामी विवेकानंद गुणवंत विद्यार्थी पुरस्कार”,रोख रक्कम दोन हजार ,प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह ,शैक्षणिक वर्ष 2021-22 ला महाविद्यालयातुन सर्वाधिक गुण घेतलेला रितीक कोवे याला कुलसचिव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचलन क्रीडा विभाग प्रमुख डॉ महेश जोशी ,प्रास्ताविक व अहवाल वाचन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा गणेश दांडेकर तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा महादेव सदावर्ते यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे ,संस्थेच्या सचिव डॉ सौ स्नेहा हरडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर यांचे मार्गदर्शन लाभले
EVENT INFO :
- Start Date:January 27, 2023
- End Date:February 3, 2023